डोनाल्ड ट्रम्पला न्यायालयाचा झटका ; प्रवेशबंदीचा निर्णय ठरविला रद्दबातल

सोमवार, 6 फेब्रुवारी 2017 (11:24 IST)
मुस्लमी बहुल राष्टांवर अमरिकात प्रवेशबंदीचा जारी करण्यात आलेला आदेश रद्दबादल करण्यात आला आहे. वॉशिंग्टनच्या एका न्यायालयाने  राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णय रद्द केला आहे. न्यायाधिशांच्या  या निर्णयावर ट्रम्प भडकले असून त्यांनी तो पुन्हा बदलण्यात येणार  असल्याचे सांगितले. 

अमेरिकातील प्रवेशबंदीचा निर्णय रद्द करत सिएटलच्या न्यायालयाने  ट्रम्प यांनी झटका दिला आहे.  या पूर्वी शुक्रवारी बोस्टन न्यायालयानेही ट्रम्प यांचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले होते. मात्र, वाशिंग्टन न्यायालयाचा आदेश संपूर्ण अमरिकेत लागू झाला आहे.

दरम्यान, हा निर्णय पुन्हा लागू करण्यासाठी व्हाइट हाऊस कडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दुसीकडे ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डबल्यू बुशद्वारा नियुक्त केलेले अमरिकी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जेम्स  रांबर्ट यांची खिल्ली उडविली आहे.

याबाबत त्यांनी ट्विट केले की देशात अनेक दहशतवादी घुसण्याची  शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आहे. मात्र न्यायाधिशांनी दिलेला निर्णय खूप भयानक आहे. या निर्णयाविरोधात न्याय विभाग दाद मागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा