साओ पाउलोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री 67 मैल (108 किलोमीटर) प्रति तास वेगाने आलेल्या वादळाने वीज ट्रान्समिशन लाइनला धडक दिली आणि अनेक झाडे उन्मळून पडली, ज्यामुळे काही भागात गंभीर नुकसान झाले.
अनेक ठिकाणी घरांचे, दुकानांचे छत उखडले. कार आणि इतर वाहने कागदाप्रमाणे वाऱ्यावर आणि पाण्यात वाहू लागली. यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, वादळामुळे अनेक विमानतळ बंद करावे लागले आणि अनेक भागात पिण्याच्या पाण्याची सेवा विस्कळीत झाली.