104 वर्षीय वैज्ञानिकाने आनंदाने का संपवलं आयुष्य ?

वैज्ञानिक डेव्हिड गुडऑल यांनी स्विझरलँडच्या एका क्लिनिकमध्ये आपलं आयुष्य संपवून घेतलं. मृत्यूचा हक्का मिळविण्यासाठी काम करत असलेल्या एका संस्थेने 104 वर्षीय गुडऑल यांच्या निधानाची माहीत दिली. 
 
डेव्हिड गुडऑल लंडनमध्ये पैदा झाले होते आणि बॉटनी व इकोलॉजीचे प्रसिद्ध वैज्ञानिक होते. 3 मे रोजी गुडऑल यांनी ऑस्ट्रेलिया येथील आपल्या घरातून विदाई घेतली आणि आपलं आयुष्य संपवण्यासाठी दुनियेच्या दुसर्‍या भागाकडे रवाना झाले होते. त्यांच्या या निर्णयावर विश्वभरातील लोकं आकर्षक झाले होते. त्यांना कोणताही भयंकर आजार नव्हता तरी ते सन्मानजनक अंत इच्छित होते. 
 
त्यांचे म्हणणे होते की त्यांचे स्वातंत्र्य हिसकावले जात आहे म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. मृत्यूचा काही वेळापूर्वी त्यांनी म्हटले की जीवनाचा शेवट आनंदी आहे. आपल्या नातेवाइकांना त्यांनी म्हटले की मागील एका वर्षापासून त्यांचे जीवन व्यवस्थित नाही म्हणून मी आयुष्य संपवून खूश आहे.
 
त्यांनी म्हटले की माझ्या मृत्यूला मिळत असलेला प्रचारामुळे वयस्कर लोकांच्या इच्छामृत्यूच्या हक्काच्या मागणीला बळ मिळेल. आणि हीच माझी इच्छा आहे.
 
एक्झिट इंटरनॅशनल नावाच्या संघटनाने गुडऑल यांना आपले आयुष्य संपवण्यात मदत केली. संस्थेचे संस्थापक फिलीप नीत्जे यांनी म्हटले की बेसलच्या लाईफ सायकल क्लिनिकमध्ये विद्वान वैज्ञानिकाचे शांतिपूर्वक निधन 10.30 वाजता झाले. गुडऑल आपल्या शेवटल्या काळात पेपरवर्कमुळे वैतागले होते. नीत्जे यांच्याप्रमाणे त्यांनी म्हटले की यात काही अधिकच वेळ लागत आहे.
 
गुडऑल यांनी शेवटी फिश व चिप्स सोबत चीज केक आहार घेतला आणि त्यांनी बीथोवनचे 'ओड टू जॉय' म्युझिक ऐकले.
 
का घेतला असा निर्णय
डॉ. गुडऑल यांनी हा निर्णय मागील महिन्यात झालेल्या एका घटनेनंतर घेतला. एके दिवशी ते आपल्या घरात पडले आणि दोन दिवस कोणालाही दिसले नाही. यानंतर डॉक्टरांनी 24 तास त्यांना देखभाल की गरज असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये राहायला सांगितले.
 
एक्झिट इंटरनेशलन याशी जुळलेल्या कैरल ओ'नील सांगते की ते स्वतंत्र व्यक्ती होते. सतत त्यांच्या पुढे मागे कोणी असावं हे त्यांना आवडतं नव्हतं. त्यांची मुळीच इच्छा नव्हती की कोणी अनओळखी लोकांनी त्यांची देखरेख करावी.
 
मृत्यूसाठी स्विझरलँडची निवड का?
स्विझरलँडने 1942 पासून असिस्टेड डेथ याला मान्यता दिलेली आहे. इतर देशांमध्ये स्वइच्छेने आपले जीवन संपवण्याचा कायदा तर आहे परंतू त्यासाठी गंभीर आजार असणे ही शर्यतदेखील आहे. ऑस्ट्रेलियन मेडिकल असोसिएशन 'असिस्टेड डाइंग' विरोधात आहे आणि याला अनैतिक असल्याचे समजतो.
 
असोसिएशन अध्यक्ष डॉ. माइकल गैनन म्हणतात की डॉक्टरांना लोकांचा मारणे ही शिकवण दिली जात नाही, असे करणे चूक आहे. हे विचार आमच्या ट्रेनिंग आणि नैतिकतेला गंभीरपणे जुळलेले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती