संयुक्त अरब अमिरातीमध्ये कोरोना लसीऱ्या तिसऱ्या टप्प्यात

शनिवार, 18 जुलै 2020 (15:54 IST)
संयुक्त अरब अमिरातीमध्ये कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात झालेली ही जगातील पहिलीच लस आहे.
 
दुबईमधील दी ४२ हेल्थकेअर आणि चीनमधील मोठी लस निर्मिती करणारी कंपनी सिनोफार्म यांनी एकत्रितरित्या ही लस तयार केली आहे. सध्या या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीला सुरूवात करण्यात आली आहे. ग्लोबल टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार संयुक्त अरब अमिरातीमधील नागरिकांसहित प्रवाशांना ही लस देण्यात आली. नोंदणी करण्यात आलेल्या १५ हजार जणांना गुरूवारी अबू धाबीमधील एक आरोग्य केंद्र शेख खलिफा मेडिकल सिटीमध्ये ही लस दिली. 
 
जी ४२ ने जारी केलेल्या निवेदनानुसार, संयुक्त अरब अमिरातीच्या आरोग्य विभागाचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन मोहम्मद अल हमीद हे या लसीच्या चाचणीत भाग घेणार्‍या पहिल्या काही व्यक्तींपैकी एक होते. संयुक्त अरब अमिरातीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी चीनद्वारे विकसित करत असलेल्या लसींवर विश्वास आणि चीनसोबत सहयोगाच्या प्रयत्नांच्या माध्यमातून महामारीला दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं याद्वारे दर्शवलं असल्याचंही तज्ञ्जांनी म्हटलं. कंपनीच्या प्रमुखांसहित आणखी १ हजार जणांना स्वेच्छेनं ही लस देण्यात आली. दरम्यान, सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू असलेल्या अन्य लसींच्या तुलनेत या लसीनं आशादायी परिणाम दर्शवले असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती