'वेस्ट पापुआ लिबरेशन आर्मी' या बंडखोर संघटनेने दावा केला आहे की त्यांचे फक्त 3 सैनिक मारले गेले, तर उर्वरित मृत निष्पाप नागरिक होते. यासोबतच, त्याने प्रत्युत्तरादाखल 2 पोलिसांना ठार मारल्याचा दावाही केला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ताज्या चकमकीनंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. याशिवाय, लष्कर आणि पोलिस संयुक्तपणे गस्त वाढवत आहेत. तथापि, स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण आहे