ब्रिटनमध्ये विमानातून येताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास बंदी

बुधवार, 22 मार्च 2017 (10:38 IST)
अमेरिकेनंतर आता ब्रिटननेही 6 मुस्लिम बहुल देशांतील प्रवाशांवर ब्रिटनमध्ये येताना विमानातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास बंदी घातली आहे.  यामध्ये टर्की, लेबेनॉन, जॉर्डन , इजिप्त, ट्युनिशिया आणि सौदी अरेबिया या देशांचा समावेश आहे. सुरक्षाकारणास्तव खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचं कारण ब्रिटनने दिलं आहे. या नियमानुसार, लेबेनॉन, जॉर्डन , इजिप्त, ट्युनिशिया आणि सौदी अरेबिया या देशातील प्रवाशांना विमानात लॅपटॉप, टॅबलेट,डीव्हीडी प्लेयर, आयपॅड आणि मोठ्या आकाराचे मोबाइल फोन नेता येणार नाहीत. आम्ही हवाई सुरक्षेबाबतचे निर्णय विचारपूर्वक घेतो, प्रवाशांच्या सुरक्षेसोबत तडजोड करता येणार नाही असं ब्रिटन सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.   ही बंदी तात्पुरत्या स्वरूपात आहे की यामध्ये नंतर काही बदल करण्यात येणार , याबाबत ब्रिटनकडून काहीही सांगण्यात आलेलं नाही. 

वेबदुनिया वर वाचा