बांग्लादेश: शेख हसीना यांच्या परतीची मागणी करत लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, लष्कराच्या पाच जवानांसह 15 जण जखमी

सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (12:46 IST)
बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतरही हिंसाचार आणि निदर्शने सुरूच आहेत. रविवारी हजारो आंदोलकांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. यामध्ये लष्कराचे पाच जवान जखमी झाले.
 
वृत्तानुसार, गोपालगंज भागात शनिवारी दुपारी ही घटना घडली. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या परतीची मागणी करत हजारोच्या संख्येने अवामी लीग कार्यकर्त्ये आणि नेते महामार्ग रोखून बसले. 

आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी लष्कराच्या जवानांनी रोखल्यावर जोरदार हाणामारी झाली. जमावाला पांगवण्यासाठी लष्कराच्या जवानांनी लाठीमार केला. प्रत्युत्तरात संतप्त जमावाने लष्कराच्या वाहनांची तोडफोड करत आग लावली. या घटनेत लष्कराचे जवान, पत्रकार आणि स्थानिक नागरिकांसह एकूण 15 जण जखमी झाले. सुमारे 3,000 ते 4,000 लोकांनी रास्ता रोको केल्याचे सांगितले. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान जखमी झाले आहेत.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराच्या सदस्यांनी गोळीबार केला. यानंतर एका मुलासह दोघांना गोळ्या घालण्यात आल्या. या घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आली.
Edited by - Priya Dixit
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती