मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीपासून ते पहाटेपर्यंत दीर अल-बलाहच्या बाहेरील भागात आणि खान युनूस शहराला लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये १३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, किमान ४८ मृतदेह इंडोनेशियन रुग्णालयात आणण्यात आले आणि १६ मृतदेह नासेर रुग्णालयात नेण्यात आले. ट्रम्प यांच्या आखाती देशांच्या भेटीच्या समारोपाच्या वेळी हे हल्ले करण्यात आले आहे. तसेच, ट्रम्प यांनी इस्रायलला भेट दिली नाही.