प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे 5.30 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र जमिनीत 10 किलोमीटर खोलवर होते.तत्पूर्वी, पहाटे 12.47 वाजता अफगाणिस्तानातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
तुर्कीच्या आपत्ती एजन्सीने (AFAD) भूकंपाची पुष्टी केली आणि कोन्या प्रांतातील कुलू जिल्ह्यात भूकंप झाल्याचे सांगितले. देशाच्या कोणत्याही भागात भूकंपामुळे कोणतेही नुकसान, दुखापत किंवा जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.