केनियामध्ये करप्रणाली विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण,39 लोकांचा मृत्यू

बुधवार, 3 जुलै 2024 (08:24 IST)
केनियामध्ये नवीन कर वाढीविरोधात हिंसक निदर्शने होत आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. आंदोलक या आठवड्यात केनियामध्ये निषेधाच्या नवीन फेरीची तयारी करत आहेत, असे एका मीडिया अहवालात राष्ट्रीय अधिकार वॉचडॉगने म्हटले आहे.
 
केनिया नॅशनल कमिशन ऑन ह्युमन राइट्स (KNCHR) च्या नोंदीनुसार, केनियामध्ये देशव्यापी कर कायद्याच्या निषेधाच्या संदर्भात 39 लोक ठार आणि 361 जखमी झाले आहेत. याशिवाय जबरदस्तीने बेपत्ता होण्याचे 32 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर 627 आंदोलकांनाही अटक करण्यात आली आहे.
 
सरकारने नवीन कर लादल्यामुळे केनियातील लोक प्रचंड संतापले आहेत. केनिया फायनान्स बिल 2024 मे मध्ये येथे सादर करण्यात आले होते, ज्यामध्ये ब्रेड, कॅन्सर उपचार, स्वयंपाकाचे तेल, मुलांचे डायपर ते सॅनिटरी पॅड, मोटार वाहने, सौर उपकरणे आणि डिजिटल सेवा यासारख्या उत्पादनांवर भारी कर लावण्याचा प्रस्ताव आहे. त्यात ब्रेडवर 16 टक्के विक्री कर, स्वयंपाकाच्या तेलावर 25 टक्के कर, मोटार वाहनांवर 2.5 टक्के व्हॅट आणि तीन टक्के आयात शुल्क प्रस्तावित आहे. 

केनियाच्या संसदेत उपस्थित सर्व खासदारांनी या विधेयकाचे समर्थन केले आहे. सरकारी काम पूर्ण करण्यासाठी हे आवश्यक आहे, असे त्यांचे मत आहे. महसूल वाढवून मिळणाऱ्या उत्पन्नातून सरकारला देशात रस्ते बांधता येतील आणि शाळांमध्ये शिक्षक नियुक्त करता येतील. शेतकऱ्यांना खतासाठी अनुदान मिळणार आहे. त्यामुळे देशाचे कर्ज कमी होईल.
नंतर संसद मध्ये मतदान झाले त्यात 195 पैकी 106 खासदारांनीयाचा पक्षात मत दिले. नंतर सम्पूर्ण परिसरात हिंसक निदर्शन झाले. 
 
केनियामध्ये 80 हजार ते एक लाख भारतीय राहतात. हिंसक निदर्शनांदरम्यान सरकारने भारतीयांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. भारतीय दूतावासाने त्यांना विनाकारण घराबाहेर पडू नये आणि हिंसाचाराच्या ठिकाणांपासून दूर राहण्यास सांगितले आहे.
 
Edited by - Priya Dixit   
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती