आश्चर्यजनक ! बुलेटप्रूफ मोबाईल ने प्राण वाचवले, सोशल मीडियावर व्हायरल झाले

बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (16:30 IST)
आपल्याला अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 'दीवार' चित्रपटातील तो दृश्य लक्षात आहे का जेव्हा मारेकऱ्यांचा पिस्तूल मधून गोळी निघते आणि त्या गोळीपासून 'विजय 'ला त्याच्या जेब मध्ये ठेवलेला 'बिल्ला क्रमांक 786 'वाचवतो. नशीब बलवत्तर असल्यामुळे अशा परिस्थितीतून देखील काही लोक वाचतात.ते तर चित्रपटातील दृश्य होते.पण खरचं जर नशीब बलवत्तर असेल आणि वेळ आली नसेल तर आपले आयुष्य वाचू शकते. असेच काही घडले आहे ब्राजील येथे, इथे एका सामान्य माणसांवर दरोडेखोऱ्याने लुटण्यासाठी गोळी झाडली.पण म्हणतात की ,काळ आला होता पण वेळ आलेली नव्हती. दरोडेखोराने झाडलेली गोळी त्या माणसाच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलला लागली आणि त्याचे प्राण वाचले.तिथल्या स्थानिक डॉक्टरांनी त्याच्या मोबाईलचे चित्र आणि घटनेची माहिती ट्विटरवर शेअर केली,तर ही  बातमी झपाट्याने सोशल मीडियावर व्हायरल झाली.
 
ही घटना ब्राजिलच्या डॉक्टरांनी ट्विटकरून सांगितली आहे,आणि त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले आहे की,या व्यक्तीवर दरोडेखोराने गोळी झाडल्यावर त्याला रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले.नशीब बलवत्तर असल्यामुळे ही गोळी त्याच्या मोबाईल फोन मध्ये अडकून पडली. या ट्विटरच्या न्यूज ला सोशल मीडियावर 6 हजार पेक्षा अधिक लाईक्स आणि 70 हुन अधिक रिट्विट मिळाले आहेत.डॉक्टरांच्या मते,त्याच्याकडील बुलेटप्रूफ मोबाईलने त्याचे प्राण वाचवले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती