एसीबीच्या नव्या अध्यक्षांची घोषणा - अफगाणिस्तानमध्ये महिलांनाही क्रिकेट खेळता येणार

शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (14:11 IST)
तालिबान ने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून तेथील महिलांच्या हक्कांबाबत जगभरात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (एसीबी) नवे अध्यक्ष मिरवाईस अश्रफ यांनी घोषणा केली आहे की, महिला अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट खेळत राहतील. अश्रफ यांनी एसीबी कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सर्व मान्यताप्राप्त देशांना महिला क्रिकेटचा भाग बनवण्याचा नियम बनवला आहे.
अश्रफ यांनी  सांगितले की, 'महिला क्रिकेट ही आयसीसीची महत्त्वाची गरज आहे. म्हणून आम्ही ते करत राहू. सर्व कर्मचाऱ्यांनी एसीबीशी बांधील राहून आपापल्या क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे काम करावे लागेल. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे अहमदउल्ला यांनी अफगाणिस्तानातील महिला क्रिकेटमध्ये भाग घेणार नसल्याचे सांगितले होते. 
एसीबीच्या नव्या अध्यक्षांच्या या घोषणेमुळे देशातील महिलांमध्ये नक्कीच आशा निर्माण होईल. तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून महिलांना या खेळात सहभागी होता येत नसल्याचे वास्तव समोर आले होते, त्यामुळे तिची ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती