चीनमध्ये स्कूल बस ने लोकांना चिरडले, पाच विद्यार्थीसहित 11 जणांचा मृत्यू

मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (11:17 IST)
चीनच्या पूर्व भागामध्ये मंगळवारी सकाळी मोठा अपघात घडला आहे. एक स्कुल बसचा अपघात झाला आहे. ज्यामध्ये पाच विद्यार्थींसोबत 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात आज सकाळी 7:27 वाजता शांदोंग प्रदेशाच्या ताईआन शहर मध्ये घडला.

तसेच ही स्कूल बस शाळेजवळ पोहचली, तेव्हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. व बसने रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना चिरडले. या अपघाताचे फोटोज सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. 
 
अपघातानंतर एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे समजले आहे. जेव्हा की दोन जणांची प्रकृती स्थिर आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओ मध्ये जखमी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती