काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान धावपट्टीवरून घसरून क्रॅश,अनेकांचा मृत्यू

बुधवार, 24 जुलै 2024 (12:33 IST)
नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी विमान कोसळले. त्यात 19 जण होते. विमान धावपट्टीवरून घसरले आणि बाहेर कोसळल्याचे वृत्त आहे. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक बातम्यांनुसार, विमानात प्रवासी नव्हते, परंतु काही तांत्रिक कर्मचारी विमानात होते.सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी एका खासगी कंपनीचे विमान 19 जणांना घेऊन हे विमान काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पोखरा जात असताना टेकऑफ करताना हा अपघात घडला. विमान धावपट्टीच्या बाहेर गेल्याने हा अपघात घडला. 
 
विमानचालकाला रुग्णालयात नेण्यात आले असून पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी बचावकार्य करत आहे. विमानाला लागलेली आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. काठमांडू विमानतळाला बंद करण्यात आले आहे. 
Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती