दक्षिण कोरियातील बॅटरी प्लांटला लागलेल्या भीषण आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रॉयटर्सने योनहाप वृत्तसंस्थेचा हवाला देत सांगितले की, सोमवारी दक्षिण कोरियातील लिथियम बॅटरी प्लांटमध्ये आग लागली. आग एवढी भीषण होती की, आगीच्या ज्वाला मोठ्या उंचीवर उठताना दिसत होत्या. बचाव कार्यादरम्यान 20 लोक बेपत्ता झाले आहेत. नंतर या सर्व 20 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
दक्षिण कोरियाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10.30 च्या सुमारास ही आग लागली. राजधानी सेऊलच्या दक्षिणेला ह्वासेओंग येथील लिथियम बॅटरी कारखान्यात ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. इतर तपशीलांची प्रतीक्षा आहे. आग लागली तेव्हा कारखान्यात सुमारे 70 लोक उपस्थित होते.