दक्षिण तैवानमध्ये 6.4 तीव्रतेचा भूकंप, राजधानी तैपेईमध्ये इमारती हादरल्या
मंगळवार, 21 जानेवारी 2025 (17:24 IST)
तैवानच्या दक्षिणेकडील चियाई शहराजवळ मंगळवारी 6.4 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला असून त्यात किरकोळ नुकसान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपाने राजधानी तैपेईमधील इमारती हादरल्या. भूकंपाचे केंद्र दापू टाऊनशिपमध्ये 9.4 किमी (6 मैल) खोलीवर होते. ताइनान शहरातील एका खराब झालेल्या इमारतीत दोन जण जखमी झाले आहेत.
तैवान दोन टेक्टोनिक प्लेट्सच्या दरम्यान स्थित आहे आणि भूकंपांसाठी अतिशय संवेदनशील आहे. येथे 2016 च्या भूकंपात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 1999 मध्ये 7.3 तीव्रतेच्या भूकंपात 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.