चीनची राजधानी बीजिंगमध्ये सोमवारी एका शाळेजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात तीन मुलांसह पाच जण जखमी झाले. हा हल्ला बीजिंगच्या वायव्य हैदियन जिल्ह्यात दुपारच्या सुमारास झाला आणि त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.
तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित याला घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. तसेच हा हल्ला एका प्रसिद्ध प्राथमिक शाळेजवळ झाला. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर शाळेजवळ एकच गोंधळ उडाला. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे.