आरोपीने कानटोपी परिधान केल्यामुळे त्याची ओळख पटू शकलेली नाही. काही मुले या हल्ल्यातून बचावली आहेत. आपत्कालीन सेवा क्रमांकावर सकाळी 12 वाजून 10 मिनिटांना मदतीची याचना करणारा एक कॉल आला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली, अशी माहिती पब्लिक सेफ्टी सचिवालयाचे प्रवक्ते यांनी दिली. पोलीस व चिकित्सक जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना घरात 11 जण मृतावस्थेत दिसले. घटनास्थळी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून पोलीस तपास करत आहेत, अशी माहितीही सचिवालयाच्या प्रवक्त्याने दिली.