हाईड एक्टचे निर्माते हेन्री हाईड यांचे निधन

वार्ता

शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2007 (12:21 IST)
भारत अमेरिका अणू करारात वादग्रस्त ठरलेला हाईड एक्ट ज्यांच्या नावामुळे अस्तित्वात आला ते माजी रिपब्लिकन खासदार हेन्री हाईड यांचे गुरूवारी शिकागोत निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.

त्यांना ह्रदयरोगाचा विकार होता. शिकागोत जन्म झालेल्या हाईड यांना हाईड कायद्याव्यतिरिक्त माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर मोनिका लेविन्स्की प्रकरणी महाभियोगाची कारवाई करण्यासाठी सुद्धा ओळखले जाते.

वेबदुनिया वर वाचा