स्विस बँक : भारतीयांचा ‘काळा पैसा’ घटला

झुरिक- स्विस बँकांमध्ये ठेवण्यात येणार्‍या काळ्या संपत्तीविरोधात भारतासह एकंदरीत जागतिक स्तरावर चालविण्यात येत असलेल्या मोहिमेच्या पाश्र्वभूमीवर भारतीय नागरिकांनी स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या संपत्तीमध्ये तब्बल एक तृतीयांशाची विक्रमी घट झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
 
भारतीयांनी स्विस बँकांत ठेवलेली संपत्ती आता एकूण 1.2 अब्ज फँक (8,392 हजार कोटी रुपये) इतकी असल्याचे आढळून आले आहे. स्विस राष्ट्रीय बँकेने यासंदर्भातील माहिती प्रकाशित केली असून 2015 च्या अखेरीस भारतीयांनी स्वित्झर्लडमधील बँकांमध्ये ठेवलेल्या संपत्तीमध्ये तब्बल 59.643 कोटी स्विस क्सची घट झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा