स्वातंत्र्यदिनी नवाझ शरिफांनी आवळला काश्मिर राग!

गुरूवार, 14 ऑगस्ट 2014 (16:20 IST)
पाकिस्तानात स्वातंत्र्यदिन आज 14 ऑगस्टला साजरा झाला. काश्मीरमुळे भारत आणि पाकमध्ये निर्माण झाल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी  यावेळी संबोधित केले.  
 
नवाझ शरिफ म्हणाले,काश्मिर प्रश्नावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढायचा आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे वातावरण दूर होईल. दोन्ही देशांमधील नात्याला एक नवीन वळण लागेल. 
 
दोन्ही देशांमधील तणावाला दहशतवाद कारणीभुत असल्याने भारताने म्हटले आहे तर काश्मिर मुद्द्यामुळे उभय देशांचे संबंध ताणले गेले आहे, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. सीमापार घुसखोरी आणि गोळीबारावरही भारताने प्रश्न उपस्थित केले आहेत. 
 
दरम्यान, पाकिस्तानमध्ये थेट लढण्याची धमक नसल्याने भारतावर छुपे युद्ध लादले जात आहे, असा आरोप भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर नवाझ शरिफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, मोदींचे आरोप तथ्यहिन आणि दुर्दैवी असल्याचे पाकिस्तानने आधीच म्हटले होते. 

वेबदुनिया वर वाचा