सिरीया संकट : विश्व युद्धाचे हालात? रशियाने अंतरमहाद्वीपीय बलिस्टिक मिसाइलचे परीक्षण केले
गुरूवार, 13 ऑक्टोबर 2016 (17:45 IST)
सिरीया संकटावर रशिया आणि अमेरिकेतील तणाव विश्व युद्धात बदलण्याची शक्यता आहे. रशियाची मिलिटरी तयारी स्पष्टपणे याचे भयावह संकेत देत आहे. पुतिन बरेच आक्रमक निर्णय घेत आहे असे दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार पुतिन यांनी रशियाच्या उच्च अधिकारी, राजनेता आणि त्यांच्या कुटुंबीयांना घरी (होमलँड) परत जायला सांगितले आहे. याच क्रमात रशियाने बुधवारी आंतरमहाद्वीपीय बलिस्टिक मिसाइलचे देखील परीक्षण केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार रशियाच्या सेनेने जपानच्या उत्तरीत तैनात आपल्या सबमरीनहून न्युक्लियर वॉरहेढ ओढण्याची क्षमता असणार्या एका रॉकेटचे परीक्षण केले आहे. रशियाच्या मीडिया एजंसीनुसार रशियाच्या उत्तर पश्चिममध्ये स्थित एक घरगुती साईटने देखील मिसाइल सोडण्यात आली आहे.
रशियाचे आक्रमक पाऊल येथेच थांबले नाही आहे. सीएनएनच्या रिर्पोटानुसार रशियाने पोलंड आणि लिथुवानियाला लागलेल्या सीमेरेषेवर देखील न्युक्लियर क्षमता असणार्या मिसाइलची तैनाती केली आहे. रशियाच्या या पाउलामुळे आंतरराष्ट्रीय समझोता तुटला आहे असे सांगण्यात आले आहे, पण सिरीया संकटाला बघून रशिया कुठल्याही समझोतेच्या मूडमध्ये दिसत नाही आहे.
रशियाने नुकतेच असे ही म्हटले आहे की सिरीयाबद्दल अमेरिकेसोबत तणाव वाढल्याने त्याचे दोन जंगी जहाज भूमध्य सागराहून परतत आहे. रशियाने म्हटले होते की त्याने आपल्या एस 300 हवाई रक्षा मिसाइल प्रणालीला सिरीयाच्या टारटस स्थित नौसेना केंद्रात पाठवले आहे.
अमेरिकी समर्थित पश्चिमी देशांचे फ्रंट सिरीयामध्ये रशियाच्या भूमिकेची निंदा करत आहे. नुकतेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आपला फ्रांस दौरा रद्द केला आहे. फ्रांसीसी राष्ट्रपती ओलांदने रशियावर सिरीयामध्ये युद्ध अपराधांमध्ये सामील होण्याचा आरोप लावला होता. असे मानले जात आहे की याच आरोप प्रत्यारोपादरम्यान उत्पन्न झालेल्या शंकेमुळे पुतिन यांनी आपली यात्रा रद्द केली आहे.
या अगोदर रशियाचे राष्ट्रपती आपल्या देशातील सर्व मोठे राजनेता, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या घरी परत जाण्याची चेतावणी दिली आहे. पुतिन यांनी चेतावणीत म्हटले आहे की ते (टॉप अधिकारी, राजनेता) विदेशात राहत असलेले आपले मुलं आणि कुटुंबातील लोकांना देशात परत बोलवावे. स्थानीय आणि वैश्विक मीडिया या आदेशाला थर्ड वर्ल्ड वॉरच्या आशंकेने बघत आहे.
रशियाचे माजी राष्ट्रपती आणि सोवियत रशियाचे नेते मिखाइल गोर्बाचोव यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. गोर्बाचाव यांनी सांगितले आहे की रशिया आणि अमेरिकामध्ये वाढत असलेल्या तणावामुळे जग एका धोकादायक मोडवर पोहोचली आहे.
2011 पासून सिरीयात गृहयुद्धासारखी परिस्थिती आहे आणि जगातील दोन महाशक्त्यांमध्ये यासाठी तणाव आहे. सिरीयाची बशर अल असद सरकार आणि विद्रोहीमध्ये युद्ध चालत आहे. अमेरिका जेथे असद विरोधींबरोबर आहे, तसेच रशिया असद सरकारला मदत करत आहे. रशिया एलेप्पोमध्ये असद सरकारच्या मदतीसाठी बमबारीपण करत आहे. मागच्या महिन्यात युद्ध विराम संपल्यानंतर देखील ही बमबारी सुरूच आहे.