सिरीयाई मुलाच्या वडिलाने सांगितले, माझ्या हातातून निसटले माझे मुलं

शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (14:04 IST)
सीरियन स्थलांतरितांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. तसेच इसीस या दहशतवादी संघटनेपासून स्वत:चा बचाव करून समुद्रमार्गातून आश्रय मिळविण्यासाठी धडपडणाऱ्यांच्या नावेला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या तीन वर्षाच्या बालकाचे समुद्रकिनाऱ्यावरचे हृदय हेलवणारे छायाचित्र सध्या जगभरातील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. आयलान कुर्दी हा तीन वर्षांचा मुलगा सीरियातील कोबानी गावातला होता. 
 
सीरियातील यादवीला कंटाळून जीव मुठीत धरुन त्याचे कुटुंब कॅनडाला जाण्यासाठी साध्या बोटीतून निघाले होते. मात्र हा एजियन समुद्रातच बोट उलटून त्याचा मृत्यू झाला. अगदी लहानग्या अशा आयलानचा लाल टी शर्ट व निळ्या चड्डी घातलेला मृतदेह वाहून किनाऱ्याला आला. त्यानंतर त्याची प्रसिद्ध झालेली चित्रे अनेकांचे काळीज पिळवटणारी ठरली. या अपघातात अब्दुल्ला यांनी आयलानसह, गालेब या चार वर्षांच्या मुलासह पत्नीला गमावले आहे. 

वेबदुनिया वर वाचा