सर्वात वृध्द महिलेचे निधन

गुरूवार, 2 एप्रिल 2015 (12:32 IST)
मिसाओ ओकावा या जगातील सर्वांत वयोवृद्ध महिलेचे निधन झाले. ओसाका येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

५ मार्च १८९८ रोजी जन्मलेल्या ओकावा यांचा गेल्या महिन्यातच ११७ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. कमीत कमी आठ तास झोप आणि आवडता आहार हे दीघार्युष्याचे रहस्य असल्याचे तीन अपत्ये, चार नातू व सहा पणतू असलेल्या ओकावा यांनी तेव्हा सांगितले होते.

विशेष म्हणजे त्यांच्या जन्मानंतर पाच वर्षांनी अमेरिकी राईट बंधूंनी जगातील पहिले विमान उडविले होते. ११४ वर्षांच्या झाल्यानंतर गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वाधिक वयाची जिवंत व्यक्ती म्हणून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली होती.

वेबदुनिया वर वाचा