सउदी अरेबियात 5 जणांना मृत्यूदंड

सउदी अरेबीयाच्‍या पश्चिमी शहर मदीनामध्‍ये चोरी, अपहरण, बलात्कार आणि मादक पदार्थांच्‍या तस्‍करी प्रकरणी पाच जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्‍यात आली असून त्यांचे शीर धडावेगळे करण्‍यात आले आहे.

गृह मंत्रालयाने या संदर्भात माहिती प्रसारित करताना सांगितले आहे, की मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेले चार जण सउदी तर एक चाड येथील नागरिक होता. या देशात गेल्‍या वर्षभरात येथे 34 जणांना देहदंडाची शिक्षा देण्‍यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा