सईदच्या मदरशावर ग्रेनेडने हल्ला

सोमवार, 2 मे 2016 (17:03 IST)
पेशावर- मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद संचालित करत असलेल्या जमात-उद-दवाहच्या मदरशावर अज्ञात व्यक्तीने ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात 14 जण जखमी झाले. त्यातून काहींची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये चार मुलांचा समावेश आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील तेलकाल बाला भागामध्ये जमात-उद-दवाहचा मदरसा आहे. मदरशावर रविवारी रात्री ग्रेनेडने हल्ला केला. अद्याप कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

वेबदुनिया वर वाचा