श्रीलंकेत मुले आणि महिलांवर बनविण्यात आलेल्या कथित अश्लील अशा 12 वेबसाइटवर निर्बंध लावण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे. कोलंबोचे चीफ मॅजिस्ट्रेट निशांत हपुआराच्ची यांनी दूरसंचार नियामक आयोगाला या वेबसाईटवर बंदी आणण्याचे निर्देश दिले आहेत.
मॅजिस्ट्रेट म्हणाले, की पोलिसांमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे हे निर्बंध घालण्यात आले आहेत.