शिल्पा शेट्टीला बॉंडपटात संधीची शक्यता

भाषा

गुरूवार, 16 ऑगस्ट 2007 (14:20 IST)
शिल्पा शेट्टीचे भाग्य उजळण्याची चिन्हे दिसत आहेत. बिग ब्रदर आणि नंतरच्या रिचर्ड गेअरशी चुंबनादी प्रकरणांमुळे आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविलेल्या शिल्पाला आता हॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. हा चित्रपटही काही असा तसा नसून चक्क बॉंडपट आहे. बॉंडपटाच्या तेविसाव्या चित्रपटासाठी शिल्पाचा विचार केला जात आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, की बिग ब्रदरनंतर प्रकाशझोतात आलेल्या शिल्पाकडे सध्याचा जेम्स बॉंड याच्या नायिकेच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. या चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले, की शिल्पाला या चित्रपटात भूमिका मिळू शकते. कारण सुंदर होण्याबरोबरच शिल्पा चांगली अभिनेत्रीसुद्धा आहे.

या चित्रपटासाठी बड्या हिरोईनची विचार केला जात आहे. शिल्पा या निकषातही बसते आहे. बॉलीवूडमध्ये तर तिची लोकप्रियता आहेच, पण पाश्चात्य देशांत विशेषतः ब्रिटनमध्येही तिच्या चाहत्यांची संख्या वाढली आहे.

वेबदुनिया वर वाचा