राजीनामा दिल्यानंतरही वाढणार मुशर्रफ यांचे उत्पन्न

भाषा

सोमवार, 25 ऑगस्ट 2008 (15:10 IST)
सत्ता गेल्यानंतर वासे उलटे फिरायला लागतात असे बोलले जाते. समर्थक विरोधक बनतात आणि विरोधकांच्या विरोधाची धार वाढते. पद गेल्यानंतर उत्पन्नही कमी होते म्हणतात. पण या साऱ्या शक्यतांना आता मुशर्रफ यांच्या भाषण कलेने पूर्णविराम लागणार आहे.

एका आंतरराष्ट्रीय जनसंपर्क कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुशर्रफ यांच्या भाषण चातुर्यामुळे त्यांची मागणी वाढणार असून, त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणार आहे. दर दिवसाचे आता त्यांना दोन लाख अमेरिकी डॉलर पर्यंत मिळू शकतात.

असे झाल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पंगतीत मुशर्रफ यांचा नंबर लागणार असून, क्लिंटन पायउतार झाल्यानंतरच त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

न्यूयॉर्क येथील एंबार्क एलएलसी या कंपनीने हे सर्वेक्षण केले असून, कंपनीनेच त्यांना ऑफर देण्याची तयारी सुरू केली आहे.

वेबदुनिया वर वाचा