जोपर्यंत दोघांच्या कुटुंबाला याबाबत माहीत नव्हतं तोपर्यंत दोघे रात्री उशीरापर्यंत या गल्लीत एकमेकाला किस करायचे. पण जेव्हा मुलीच्या वडिलांना माहीत पडले त्यांनी आपल्या मुलीची हत्या केली. काही लोकांचे म्हणणे आहे की तिला वाचवण्यासाठी लुईसने बाल्कनीतून उडी मारली आणि खाली पडल्यामुळे त्यांची मान मुरगळली. ज्या खोलीत डोना राहायची तिथे आता एक गिफ्ट शॉप आहे. प्रेमी त्या गल्लीत येतात आणि आपले नाव आणि संदेश सोडून जातात. आणि प्रेम स्थायी राहावं म्हणून येथील खिडकीवर कुलूपही लावतात.