मोदी-शरिफांचे केवळ ‘हातवारेच’

गुरूवार, 1 ऑक्टोबर 2015 (13:40 IST)
अमेरिकेच्या दौºयादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना लांबूनच हातवारे केले. या दोघांमध्ये कोणतीही बैठक अथवा चर्चा झाली नाही.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या संरक्षण शिखर परिषदेत हे नेते एकत्र आले. मोदी सर्वप्रथम चेंबर हॉलमध्ये आले. त्यानंतर काही मिनिटांनी शरीफ आले. कार्यक्रम सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी शरीफ यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाहून हात हलवला. ते पाहून मोदींनी स्मित करीत हात हलवून त्यांना प्रतिसाद दिला.

वेबदुनिया वर वाचा