मुस्लिम विरोधी आहे मोदी: मुशर्रफ

सोमवार, 1 फेब्रुवारी 2016 (17:13 IST)
इस्लामाबाद- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तान आणि मुस्लिम विरोधी आहे आणि ते पाकला फसवत आहेत, असे पाकचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले आहे. 
 
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुशर्रफ म्हणाले, ‘मोदी हे पाकिस्तान व मुस्लिम विरोधी नेते आहेत. त्यांचा पाकिस्तान दौरा ठीक आहे. परंतु, यामधून काही साध्य होणार नाही. पाकिस्तानला ते फसवतच आहेत.‘ यादरम्यान दहशतवाद समस्येवर चर्चा करीत ते पूर्व पीएम अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्याबद्दलही बोलले.

वेबदुनिया वर वाचा