भूकंपाच्या धक्याने जपान हादरले

मंगळवार, 26 मे 2015 (11:50 IST)
जपानची राजधानी असलेल्या टोकियो शहरासह येथील आसपासच्या शहरास भूकंपाचा जबरदस्त हादरा बसला. याची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा धक्का बसला असला तरी कोणतीही जीवितहानी झालेली नसून त्सुनामीची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. 
 
टोकियोच्या ईशान्येस काही अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. इमारती हादरू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. रेल्वे आणि विमानसेवा काही काळ खोळंबली. यामुळे कोठेही जीवितहानी झाली नाही. जपानमध्ये यापूर्वी 11 मार्च 2011 रोजी भूकंप व त्सुनामीच्या आलेल्या संकटामुळे सुमारे 20 हजार नागरिक मृत्यूमुखी पडले होते. 

वेबदुनिया वर वाचा