भितीदायक! जंगल सफारी मध्ये सिंहाचा हल्ला (व्हिडिओ)

चीनच्या एका जंगल सफारी पार्कमध्ये सिंहाने केलेल्या हल्ल्यात एका महिलेची मृत्यू झाली, आणि एक अन्य जखमी झाली.
चिनी मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे सिंहाने महिलेवर ती कारच्या बाहेर असताना हल्ला केला. हे बघताच दुसरी महिला तिला वाचविण्यासाठी बाहेर निघाली आणि दुसर्‍या सिंहाने तिच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात वाचवण्यासाठी उतरलेल्या महिलेचा मृत्यू झाला.
 
रिपोर्ट्स प्रमाणे काही क्षणातच सुरक्षाकर्मी तिथे पोहचले होते तरी, महिलेचे प्राण वाचले नाही. 
 
व्हिडिओ...
 
बीजिंगजवळ स्थित बीजिंग बडालिंग वाइल्डलाइफ पार्क येथे येणार्‍या दर्शकांना आपल्या गाडीने फिरण्याची परवानगी आहे. येथे येणार्‍यांना गाडीतून बाहेर निघू नये असे बजावण्यातही येतं. कारमध्ये काही गोष्टीमुळे वाद निर्माण झाल्यामुळे ती महिला उतरली होती.

वेबदुनिया वर वाचा