भारत-पाक सचिव स्तरावरील चर्चा रद्द होणे दुर्दैवी- अमेरिका

मंगळवार, 19 ऑगस्ट 2014 (14:03 IST)
फुटिरतावाद्यांशी पाकिस्तानने चर्चा केल्यामुळे भारताने पाकिस्तानसोबत होणारी सचिव स्तरावरील चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय घेतला. परंतु भारताचा हा निर्णय दुर्दैवी असल्याचे अमेरिकन प्रशासनाने म्हटले आहे.
  
भारत व पाकिस्तानदरम्यान होणारी चर्चा रद्द होणे दुर्दैवी आहे. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते मारी हार्फ यांनी मांडले आहे. अमेरिकेकडून दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी नेहमीच मदत करण्यात येत आहे. तसेच भविष्यातही होत राहील. 
 
दरम्यान, पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सोमवारी एका विघटनवाद्यासोबत बैठक घेतल्याच्या पार्श्वभूमीवर विदेश सचिव सुजाता सिंग यांनी भारताची नाराजी व्यक्त केली आहे. तसेच येत्या 25 ऑगस्टला इस्लामाबाद येथे होणारी भारत-पाकदरम्यानची सचिव स्तरावरील चर्चाही तडकाफडकी रद्द केली आहे. सध्याच्या वातावरणात या चर्चेचा उद्देश साध्य होणार नाही, असेही भारताने स्पष्ट केले. 
 

वेबदुनिया वर वाचा