सामान्यतः: आपल्याला वाटतं की जेव्हा लिलाव होतो तेव्हा बिल्डिंग, फर्निचर, पेंटिंग, सेलेब्रिटीजच्या वस्तू कोटी रुपय्यांमध्ये विकण्यात येतात. या सर्व वस्तू महागच असतात, म्हणून काही विशेष असल्यामुळे हे आणखी महागात खरेदी करणे सामान्य बाब आहे परंतू आपल्या हे जाणून आश्चर्य वाटेल की एका भारतीय बिझनेसमॅनने 60 कोटी रुपये खर्च केले आहे केवळ आपल्या कारच्या नंबर प्लेटसाठी. सोशल मीडियावर या खरेदीची खूप चर्चा होत आहे.
हे ऐकल्यावर आपल्या मनात नक्कीच ही गोष्ट येत असेल की 60 कोटींची केवळ नंबर प्लेट खरेदी करणार्या या माणसाकडे कार कोणती असेल. तसेच या नंबर प्लेटमध्ये सोनं, हिरे, मोती किंवा महागड्या वस्तू वापरल्या असाव्या, परंतू असे काहीही नाही.
भारतीय बिझनेसमॅन, बलविंदर साहनी, यांनी दुबईत झालेल्या या लिलावामध्ये भाग घेतला. ही नंबर प्लेट ज्यावर केवळ 'डी5' ( D5 ) लिहिले होते, साहनी यांनी त्यासाठी 30 मिलियन दिरहम (60 कोटी रुपये) मध्ये खरेदी केली. साहनी यांनी ही नंबर प्लेट आपल्या रोल्स रॉयस कारसाठी घेतली आहे. त्यांना विशिष्ट नंबर प्लेट खरेदी करण्याची आवड आहे. बलविंदर साहनी, दुबईत प्रॉपर्टी मॅनेजमेंट फर्म चालवतात आणि 300 इतर बोली लावणार्यामधून त्यांनी ही नंबर प्लेट मिळवली आहे.