भारताचा खजिना परत करण्याचा निर्णय : ओबामा

मंगळवार, 7 जून 2016 (11:40 IST)
दोन वर्षांत भारतातून चोरी झालेल्या सांस्कृतिक वारशांना पुन्हा मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वित्झर्लंडमध्ये सांगितलं. भारतात काही पुरातन कलाकृती असून त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कलाकृती पाहून आपले पूर्वज विज्ञान आणि कलेच्या क्षेत्रात किती मातब्बर होते, याची जाणीव होत असल्याचं मोदींनी सांगितलं.
 
हा सर्व खजिना आम्हाला परत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मोदींनी बराक ओबामा यांचे आभार मानले. मोदी आज अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात मोदी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. अमेरिकेचे थिंक टँक मानल्या जाणाऱ्यांशीही मोदी संवाद साधतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचा हा चौथा दिवस आहे.
 
गेल्या  आम्हाला आमच्या भूतकाळाशी नाळ जोडण्यास मदत होईल, असं सांगतानाच सरकार अशा तस्करीविरोधात कठोर कायदा करण्याच्या तयारीत असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.

वेबदुनिया वर वाचा