ब्रिटनच्या चिमुकल्या राजकुमारीचं नामकरण

बुधवार, 6 मे 2015 (15:02 IST)
ब्रिटनच्या राजघराण्याच्या छोटय़ा राजकुमारीचं नामकरण करण्यात आलं आहे. ‘शार्लेट एलिझाबेथ डायना’ असं ठेवण्यात आलं आहे. किंग्जस्टन पॅलेसतर्फे याबाबतची घोषणा करण्यात आली. डय़ूक आणि डचेस ऑफ केंब्रिजने त्यांच्या मुलीचं नाव ‘शार्लेट एलिझाबेथ डायना’ ठेवलं आहे, असं पॅलेसतर्फे सांगण्यात आलं आहे. तिचं अधिकृत नाव ‘हर रॉयल हायनेस प्रिन्सेस शार्लेट ऑफ केंब्रिज’ असेल. राजकुमारी शारलेचं स्थान ब्रिटनची राजगादी मिळवणार्‍या राजघराण्यातील सदस्यांच्या रांगेत चौथे आहे. 
 
प्रिन्स विल्यमच आईने डायनाला सन्मान देण्यासाठी छोटय़ा राजकुमारीच्या नावामध्ये ‘डायना’ नावाचा समावेश केला आहे. लंडनच्या सेंट मेरी रुग्णालाच्या लिंडो विंगमध्ये शनिवार केट मिडलटनने मुलीला जन्म दिला होता. ब्रिटनचे नागरिक छोटय़ा राजकुमारीच्या जन्माबाबत फारच उत्साहित होते. तिच्या जन्मानंतर लंडनमध्ये ठिकठिकाणी रॉयल गन सॅल्यूट देण्यात आला होता.

वेबदुनिया वर वाचा