बीजिंग (चीन) - चीनमधील एड्‌सग्रस्तांमध्ये

शनिवार, 28 नोव्हेंबर 2015 (17:28 IST)
विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून येत आहे. ही चिंतेची बाब असल्याचे या विषयातील तज्ज्ञाने चीनमधील एका दैनिकाशी बोलताना म्हटले आहे. 
 
चीनमध्ये या वर्षअखेर अंदाजे 1 लाख 10 हजार नवीन एड्‌सग्रस्त रुग्ण आढळून येण्याची शक्‍यता असून त्यापैकी 3 हजार 400 पेक्षा अधिक रुग्ण 18 ते 22 वयोगटातील विद्यार्थी असण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे प्रमुख वु झुंगयू यांनी वर्तविला आहे. 
 
2008 मध्ये ही संख्या 779 एवढी होती. मात्र आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून ही चिंताजनक बाब असल्याचेही ते म्हणाले. "तरुण विद्यार्थ्यांचा एड्‌सपासून बचाव करणे मोठे आव्हानात्मक काम आहे‘, असेही 
झुंगयू यांनी पुढे म्हटले आहे. आतापर्यंत एकूण बाधित विद्यार्थ्यांपैकी तब्बल 81 टक्के जणांना समलिंगी संबंधातून एड्‌सची लागण झाल्याचेही झुंगयू यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा