पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबामा यांना प्रजासत्ताकदिनी उपस्थित राहावे असे निमंत्रण पाठविले होते. तसेच मोदी यांनी नुकताच अमेरिका दौरा केला आहे. भारत-अमेरिका या दोन्ही राष्ट्रात मैत्रिचे संबंध दृढ होत आहेत. 26 जानेवारी 2015 रोजीच्या भारतीय प्रजासत्ताकदिनी अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष पहिल्यांदाच उपस्थित राहणार असल्याने या सोहळयाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.