बराक ओबांमांनी नरेंद्र मोदींना विचारले ‘केम छो…’

मंगळवार, 30 सप्टेंबर 2014 (11:56 IST)
पाच दिवसीय अमेरिका दौर्‍यांवर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी) व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची भेट घेतली. यममान बराक ओबामांनी ‘केम छो मिस्टर प्राईम मिनिस्टर’ असे संबोधत मोदींचे स्वागत केले. मोदी आणि ओबामांनी जवळपास दीड तास चर्चा केल्याची माहिती परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी दिली.
 
बराक ओबामांची भेट हा नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यातील सभळ्यात महत्त्वाचा टप्पा होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दरवाजावर येऊन नरेंद्र मोदींचे स्वागत केले. दोन्ही राष्ट्राध्यक्षांची ही पहिलीच भेट होती. भेटीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी ओबामा यांच्यासाठी आणलेली ‘भगवद्‍गीता’ त्यांना भेट म्हणून दिली. 
 
ओबामा यांच्यासोबत डिनरसाठी उपराष्ट्रपती जोए बिडेन, परदेशमंत्र जॉन केरी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुजैनराइस यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान मोदींसोबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परदेश सचिव सुजाता सिंह आणि राजदूत एस. जयशंकर हेदेखील उपस्थित होते.  मोदींचे नवरात्रीचे उपवास सुरु आहे. त्यामुळे ओबामांनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीत मोदींनी केवळ लिंबू पाणी घेतल्याचे प्रवक्यांनी सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा