प्रसिध्दीसाठी त्याने धडकविले विमान!

सोमवार, 30 मार्च 2015 (11:39 IST)
जर्मन विंग्जचे ए-३२० हे विमान अँड्रियाज ल्युबित्झ या सहवैमानिकानेच पाडल्याने स्पष्ट होऊ लागले असून आपल्या नावाची प्रसिध्दी व्हावी, यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे तपासात पुढे आल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.
 
हे विमान आल्प्स पर्वतरांगेत कोसळून १५० प्रवासी ठार झाले होते. मुख्य वैमानिक कॅप्टन कॉकपिटमधून बाहेर आल्यानंतर सहवैमानिक अँड्रियाज ल्युबित्झने कॉकपिटचे दार बंद केले आणि काही कळायच्या आत ते पर्वतांवर धडकाविल्याचे तपासात पुढे आले आहे. अँड्रियाज हा मानसिक रुग्ण असल्याची माहिती पुढे आली होती. त्याच्यावर उपचारही करण्यात आले होते.
 
‘एक दिवस माझे नाव सर्वांना माहीत होईल’, असे तो बोलत होता, असा खुलासा त्याच्या प्रियसीनी केल्यामुळे त्यानेच विमान कोसळविल्याच्या शक्यतेला बळकटी मिळाली आहे.

वेबदुनिया वर वाचा