पुरुषांपेक्षा बायकांचे विचार वेगळे!

स्त्री आणि पुरुष यांच्यात ज्या प्रमाणे शारीरिक भिन्नता असते, तसेच त्यांच्या विचारातही वेगळेपणा असतो असे एका सर्वेक्षणात तज्ज्ञांना आढळून आले असून, स्त्री, पुरुषापेक्षा वेगळा विचार करत असते असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

पब्लिक लायब्रेरी ऑफ सायंस जेनेटीक्स जर्नलमध्ये या विषयाचे सर्वेक्षण प्रकाशित करण्यात आले असून, यात वैज्ञानिकांच्या यासर्वेक्षणाचा अहवाल देण्यात आला आहे.

स्त्री आणि पुरुषांमध्ये काही अंशी वैचारिक अंतर असून, आक्रमकता, दयाभावना, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यात या दोघांमध्येही बरेच अंतर असल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले आहे.

इतकेच काय तर जोडीदार निवडताना पुरुषांचा कल हा आकर्षक आणि सुंदर तरुणींकडे असतो, तर मुलींना मात्र प्रसिद्ध आणि ज्याची सामाजिक परिस्थिती चांगली आहे अशा मुलांना जोडीदार बनवण्यास आवडते.

वेबदुनिया वर वाचा