पाकिस्तानला माहिती पुरवणारा पोलीस अधिकारी निलंबित

शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016 (14:19 IST)
पाकिस्तानला जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेची गुप्त व संवेदनशील माहिती पुरवणा-या पोलीस अधिका-याला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक तन्वीर अहमद असे त्याचे नाव आहे. याबाबत जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक के. राजेंद्र कुमार यांना संशय आल्यानंतर त्यांनी तन्वीर अहमद यांच्यावर पाळत ठेवली होती. त्यानंतर पुरावे हाती आल्यानंतर गुरूवारी अहमद यांना निलंबित करण्यात आले. गेल्या काही काळापासून तन्वीर अहमद टेलिफोनच्या माध्यमातून सतत सीमावर्ती भागातील पाकिस्तानी एजंट्सच्या संपर्कात असल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून मिळाली होती. दुसरीकडे आरोपी तन्वीर अहमद यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा