पाकमध्ये १२ दहशतवाद्यांना एकादिवशी फाशी

गुरूवार, 19 मार्च 2015 (11:11 IST)
दहशतवाद व हत्येचा आरोप असणाºया १२ जणांना पाकिस्तान सरकारने एकाच दिवशी फाशी दिली आहे. झांग, कराची, लाहोर, रावळपिंडी, मुलतान, मियावाली, फैसलाबाद, गुरानवाला या तुरुंगात या कैद्यांना फासावर चढविण्यात आले. १७ डिसेंबर रोजी फाशीच्या शिक्षेवरील बंदी उठवल्यापासून आतापर्यंत फाशी दिलेल्या कैद्यांची संख्या ३९ झाली आहे.

पाकिस्तानात पेशावर येथील लष्करी शाळेवर तालिबानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात १३२ शाळकरी मुलांसह १५० जणांचा मृत्यू झाल्यानंतर पाक सरकारने १७ डिसेंबर रोजी फाशीच्या शिक्षेवरील बंदी उठवली आहे.

वेबदुनिया वर वाचा