पाकमध्ये हिंदू विवाह कायद्यास संमत्ती

बुधवार, 10 फेब्रुवारी 2016 (11:05 IST)
पाकिस्तानात राहणार्‍या  अल्पसंख्यांक हिंदूंसाठी हिंदू विवाह कायदा विधेयकास संसदीय मंडळाने एकमताने मान्यता दिली आहे.
 
नॅशनल असेम्ब्लीच्या स्थायी समितीने सोमवारी हिंदू विवाह विधेयक २०१५ चा अंतिम मसुदा संमत केला. तेथे पाच हिंदू लोकप्रतिनिधींना मुद्दाम बोलावण्यात आले होते. समितीने विधेयक एकमताने संमत केले. त्याआधी विधेयकात स्त्री आणि पुरुषासाठी विवाहाचे किमान वय १८ निश्चित करणे आणि कायदा संपूर्ण देशात लागू करणे या दोन दुरुस्त्या करण्यात आल्या.

वेबदुनिया वर वाचा