पाकमधील विमानतळावर दहशतवादी हल्ला

सोमवार, 31 ऑगस्ट 2015 (13:15 IST)
ग्वादर येथील विमानतळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन अभियंते ठार झाले. दुचाकींवर आलेल्या आणि मोठ्या प्रमाणावर शस्त्रे असलेल्या बारा दहशतवाद्यांनी ग्वादर जिल्ह्यातील जिवानी विमानतळावर हल्ला केला.

या हल्ल्यात त्यांनी विमानतळाच्या प्रशासकीय भागात प्रवेश करत रडार यंत्रणा नष्ट केली. तसेच, येथे काम करणाºया दोन अभियंत्यांनाही त्यांनी ठार मारले. तसेच आणखी एकाचे अपहरण करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा