पाकमधील निव़डणुकीचा निर्णय मगळवारी

एएनआय

सोमवार, 31 डिसेंबर 2007 (14:18 IST)
बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर पाकिस्तानात आठ जानेवारीला होणार्‍या सार्वत्रिक निवडणुका होणार की नाही याचा फैसला मंगळवारी होणार आहे.

निवडणुकांसंदर्भात आम्ही सर्व प्रांतीय सरकारकडून आणि प्रांतीय निवडणूक आयोगाच्या प्रमुखांकडून अहवाल मागितले आहेत. हे सर्व अहवाल आज सायंकाळपर्यंत येतील आणि यासंदर्भात उद्या निर्णय घेतला जाईल, असे निवडणूक आयोगाचे सचिव कन्वर दिलशाद यांनी सांगितले.

या निवडणुका आता मार्चपर्यंत पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा