पगार दोन लाख, काम अश्लील चित्रपट बघायचे

भारतात अॅडल्ट सिनेमावर बंदी आहे, परंतु जर कोणी आपल्याला अॅडल्ट चित्रपट बघण्यासाठी पगार देणार असेल आणि तेही तब्बल दोन लाख रुपये तर अनेक लोकं ही नोकरी करण्यासाठी नक्कीच तयार होतील.
 
एका इंग्रजी वेबसाइटप्रमाणे डेन्मार्क येथे अॅडल्ट सिनेमा बघणार्‍यासाठी वैकेंसी जारी करण्यात आली आहे. ही जाहिरात येथील एका पबने दिले आहे. या नोकरीसाठी निवडलेल्या उमेदवारला केवळ पोर्न बघायचे आहे. त्यासाठी 2 लाख रुपये दरमहा पगार देण्यात येईल. पब मालकाने केवळ बार पब्लिसिटीसाठी ही वैकेंसी काढली आहे.
 
डेन्मार्कच्या आरहुस येथे हॉर्नस्लेथ बार मध्ये होत असलेल्या या भरतीसाठी येणार्‍या उमेदवाराचे वय 18 वर्षाहून अधिक असणे आवश्यक आहे. बारने आपल्या फेसबुक पेजवर ही जाहिरात जारी केली आहे. यात एक आठवड्यात किमान 20 तास पोर्न पाहावे लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा