नेपाळ: अपघातात 12 भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू

बुधवार, 22 एप्रिल 2015 (11:59 IST)
काठमांडू। नेपाळची राजधानी काठमांडूजवळ बुधवारी सकाळी भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. या भीषण अपघातात 12 यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून 37 जण जखमी झाले. जखमी यात्रेकरूंना काठमांडूतील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिस अधिकारी तेजेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, काठमांडूपासून 16 किमी अंतरावर असलेल्या डोंगराळ भागात ही बस 300 मीटर दरीत कोसळली. काठमांडूहून निघताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

वेबदुनिया वर वाचा